कोण वसुली करतं हे राजकीय पक्षांनी बोलू नये, हमाम में सब नंगे है – संजय राऊत

Sanjay Raut & Devendra Fadnavis

नवी दिल्ली : सचिन वाझे यांना पोलीस दलात पुन्हा रुजू करण्यासाठी शिवसेनेने माझ्यावर दबाव आणला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काही नेतेही मला यासंदर्भात भेटले होते, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच वाझे हे वसुली अधिकारी होते, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला होत. त्यावर शिवसेनेचे खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. कोणत्या राज्यात कोण वसूली करतं हे सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी वसूली इंचार्ज कोण होतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलू नये. हमाम में सब नंगे है, असं राऊत म्हणाले.

वाझे याना पुन्हा रुजू करण्यासाठी कोणते नेते भेटले याचे पुरावे असेल तर नाव घेऊन बोलावं. त्या नेत्यांची नावं घ्या. उगाच हवेत तीर मारू नका. तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं आव्हानच राऊत यांनी फडणवीसांना दिलं.

आज काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या दबावातून करण्यात आल्या असं विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते खोटं आहे. ठाकरे सरकारवर कोणताही दबाव नाही. ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बदल्या करण्यात आल्या. मात्र, या रुटीन बदल्या नाहीत. ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आणि मीडियात रोज काही ना काही येत आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यावर शंका आहे. त्यांची चौकशी होईपर्यंत बदल्या कराव्यात असं मुख्यमंत्र्यांना वाटलं म्हणून त्यांनी या बदल्या केल्या, असं ते म्हणाले.

वाझेंना निलंबित करण्यात आलं होतं तरीही त्यांना पोलीस दलात का घेण्यात आलं असं फडणवीस विचारत आहेत. ठिक आहे. ते माजी मुख्यमंत्री होते. वाझेंना कशाबद्दल निलंबित करण्यात आलं हे त्यांना माहीत आहे. एका अतिरेक्याची चौकशी करत असताना तो प्रकार घडला आणि त्यातून त्यांना निलंबित करण्यात आलं. हे फडणवीसांना माहीत नाही का? आज ते कुणाच्या फेव्हरमध्ये बोलत आहेत? त्यावेळच्या तपास अधिकाऱ्याच्या बाजूने फडणवीस बोलणार नाही का? असा सवाल करत महाराष्ट्राचं डीएने वेगळं आहे. हे फडणवीसांनाही माहीत आहे. एका माजी मुख्यमंत्र्याने मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करणं योग्य नाही, फडणवीसांनी ते करू नये, असंही ते म्हणाले. एनआयए आणि एटीएस या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल. सर्व वहीखाता बाहेर येईल. त्यानंतर बोलूच असं सांगताना फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत सत्यापासून फारकत घेऊन बोलत होते, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच अश्या प्रकरणामुळे सरकारचे काहीही बिघडणार नाही. हे सरकार पाच वर्षे चालेल नाही तर धावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER