सुषमा स्वराजांना का आठवल्या होत्या शरद पवारांवरून ललिता पवार?

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) आज ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला . पवारांच्या राजकीय कार्यकर्तृत्वावर अनेक दिग्गज नेत्यांनी तोंडभरून भाष्य केलं आहे.

त्यातीलच एक किस्सा म्हणजे, नरसिंह राव यांचे सरकार असताना हे सरकार पडणार की राहणार अशी चर्चा होती. त्या वेळी हे सरकार राहणार असं भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांना वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं. कारण नरसिंह राव यांच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे होते. विरोधकांचे सर्व डावपेच पवार हाणून पाडण्यात तरबेज असल्यानेच सुषमा स्वराज यांनी त्यांना ललिता पवार यांची उपमा दिली होती.

रामविलास पासवान आणि आता शरद यादव म्हणाले, नरसिंह राव यांचे सरकार पडणार नाही. अरे भाई, नरसिंह राव तर मौन बाळगून आहेत. भूमिका तर पवार वठवत आहेत. आणि शरद पवार हे शरद पवारांची भूमिका वठवत नसून ललिता पवारांची भूमिका वठवत आहेत, अशी टीका स्वराज यांनी करताच संसदेत एकच हशा पिकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER