राष्ट्रवादीकडून लवकरच राजकीय भूकंप? खडसे आणि पाटील करणार करेक्ट कार्यक्रम

Eknath khadse-Jayant Patil

मुंबई :- भाजपच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा सारिका पवार (Sarika Pawar) व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यांना राष्ट्रवादीत आणल्याने नाथाभाऊ आता पिंपरी-चिंचवडमध्येही सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी काल खडसे यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीत भाजपच्या (BJP) आणखी ‘करेक्ट कार्यक्रमा’ची (Correct Program) चर्चाझाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र हा करेक्ट कार्यक्रम कुठे होणार याचे उत्तर मिळू शकलेले नाही. आता या विषयावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजपला मोठा धक्का देत ‘करेक्ट कार्यक्रम’ पार पाडला होता. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात हा शब्द आता उच्चारला जात आहे. पंढरपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनेही हा शब्द वापरला होता. एकनाथ खडसे यांनी सांगलीप्रमाणेच जळगाव महापालिकेत चमत्कार घडवून आणत भाजपची सत्ता घालवली.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या राज्यभरातील शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पिंपरीमध्ये भाजपची सत्ता असून येथील निवडणूकही पुढील वर्षी होणार आहे. सारिका पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील व नाथाभाऊंमध्ये तासभर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचा भाजपला दणका, पुण्यातील महिला नेत्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button