मॉल्स आणि कपड्याचा दुकानातील चेंजिग रुमची पोलिस तपासणी करणार

police station

नागपूर : शहरातील सीताबर्डी भागातील एका रेडिमेडच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये महिला आणि तरूणीचंचे कपडे बदलताना छुप्या कॅमेराद्वारे चित्रण केल्या जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक शहरातील
विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांत जाऊन चेंजिंग रुपची तपासणी करतील. या संतापजनक प्रकारानंतर नागपूर पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे येथे छुपे कॅमेरे तर लावलेले नाहीत ना? याची खात्री करून
घेईल. पोलिस साध्या वेशात तर कधीही ग्राहक बनून जातील आणि तपासणी करतील. त्याचप्रमाणे मॉल्स आणि कापड दुकानात काम करणा-या सेल्समनचे पोलिस पडताळणी बंधनकारक राहणार असल्याचे झोन-2 च्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी म्हटले आहे.

नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) घडलेला हा प्रकार एका तरुणीच्या सतर्कतेमुळे पुढे आला आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एकाकर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्या दोघांनाही अटक केली आहे.