होम आयसोलेटेड रुग्णांवर पोलीसांचा वॉच

Police watch on home isolated patients

कोल्हापूर : शहरातील वाढता कोरोना (Corona) संसर्ग विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबविण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महापालिका प्रशासनास केली आहे. त्यानुसार महापालिका आणि पोलीसदल यांची संयुक्त पथके तैनात केली आहेत. शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित होम- आयसोलेटेड (Home-Isolated) रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड रुग्णांवर पोलिस पथकांचा आता वॉच राहणार आहे. अशा रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या आहेत.

ही पथके होम-आयसोलेटेड रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. कोरोनाबाधित होम-आयसोलेटेड रुग्ण यांच्यावर विशेष लक्ष देण्यासाठी कोरोना योद्धा शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी, मनपा कर्मचारी व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन यांचे एकत्रित पथक तयार करण्यात आली आहेत. या पथका मार्फत होम आयसोलेटेड रुग्णांच्या घरी भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. या पथकाद्वारे करण्यात येणाऱ्या दूरध्वनीला प्रतिसाद द्या, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER