प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेशाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात पोलीस बंदोबस्त कडक

Vithoba Temple - Prakash Ambedkar

पंढरपूर : उद्या, ३१ ऑगस्टला पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांसोबत विठ्ठल मंदिरात प्रवेश करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला. यानंतर, हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने मंदिराच्या बाहेर अडथळे उभारणे सुरू केले आहे. पोलीस बंदोबस्त कडक केला आहे.

रविवारी पंढरपुरात (Pandharpur) कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसटी वाहतूक बंद केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ‘अनलॉक’ करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. मात्र, मंदिर प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. वंचित बहुजन आघाडीने मंदिर प्रवेशाचा मुद्दा हातात घेतला आहे. ३१ ऑगस्टपूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर वारकरी संप्रदायाच्या महाराजांसह लाखो वारकऱ्यांसोबत ‘मंदिर प्रवेश’ आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर दोन लाख वारकऱ्यांसोबत आंदोलन करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी बससेवा चालू करण्यात आली. पानटपऱ्या, सलून तसेच इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत.

…तर विठ्ठल मंदिर बंद का?
राज्यात दारू, गुटख्याची दुकाने चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा प्रश्न विश्व वारकरी सेनेचे संस्थापक हभप अरुण महाराज बुरघाटे व शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला या, असे आवाहन त्यांनी वारकऱ्यांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER