कोरोनाचे नियम न पाळल्याने ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शूटिंग पोलिसांनी थांबवले

Police stopped shooting for One Villain Returns for not following Corona's rules

कोरोनाचा (Corona) कहर अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनावर लस आली असल्याने नागरिक निर्धास्त झाले असल्यानेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा होणारा प्रसार लक्षात ठेऊनच सरकारने बॉलिवूडला सिनेमाच्या शूटिंगची परवानगी देताना काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांच्या अधीन राहूनच सिनेमाची शूटिंग करणे आवश्यक आहे. पण काही निर्माते, कलाकार या नियमांकडे दुर्लक्ष करतात. आपण सेलेब्रिटी आहोत, पोलीस काय करणार असा त्यांना विश्वास असतो. त्यामुळे अनेकदा बॉलिवूडमधील अनेक जण सरळ सरळ कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. जॉन अब्राहम आणि दिशा पाटनीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमाचे मुंबईत शूटिंग सुरु होते. पण कोरोना नियमांचे पालन न केल्याने पोलिसांनी शूटिंग थांबवले.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ (One Villain Returns)मध्ये जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी प्रथमच एकत्र काम करीत आहेत. त्यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 2014 मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ सिनेमाचा सिक्वेल आहे. त्या सिनेमात श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका होत्या. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमाची टीम शुक्रवारी रात्री मुंबईच्या वरळी येथील कोळीवाड्यात शूटिंग करीत होती. सेटवर चांगलीच गर्दी होती. मात्र सेटवर कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. शूटिंग पाहाणाऱ्या काही जणांनी पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांची गाडी शूटिंगस्थळी पोहोचली आणि त्यांनी शूटिंग थांबवले. शूटिंग थांबले असते तर शूटिंगसाठी आणखी एक दिवस यावे लागले असते. त्यामुळे निर्मात्यांनी पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त केली आणि कोरोना नियमांचे पालन करून शूटिंग करू असे आश्वासन दिले. निर्मात्यांनी आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी पुन्हा शूटिंग करण्याची परवानगी निर्मात्यांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER