पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस अजूनही गप्प? चित्रा वाघ यांची सीबीआय चौकशीची मागणी

Chitra wagh -Pooja Chauhan

पुणे :- पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपास सोपवण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली. त्या पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.

वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण प्रकरण तडीस नेणार आहे. एक महिना होऊन गेला तरी या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचे सोडाच मात्र, महिन्याभरात पोलसिांनी नेमका काय तपास केला याचा कुणालाच माहिती नाही. पुण्याच्या पोलीस आयुक्तांसह कुणीच या विषयातवर बोलायला तयार नाही. या साऱ्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेविषयी सुरवातीपासूनच शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात पुणे पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचे जाणवत आहे. असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

आपल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री गुन्ह्यांचा आलेख तपासण्यात गुंग आहेत. लातूर जिल्ह्यात एक तरुणी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपानुसार नोकरीची मागणी करीत आहे. तर तेथील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. नोकरी का देत नाही अशी तक्रार केली असता उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असे वाघ म्हणाल्या.

येथे कुंपणच शेत खात आहे. तर न्याय कोणाकडे मागावा. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेवर औरंगाबाद येथे बलात्काराचा प्रयत्न झाला. कोविडसाठी दाखल झालेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी एसओपी (स्टँडर्ड ऑप्रेटिंग प्रोसिजर) असावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER