कोल्हापूर : पोलीस भरतीमुळे मैदानावरील गर्दी वाढली

Maharashtra Police

कोल्हापूर : प्रस्तावित साडेबारा हजार पोलीसांची भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. जाहीर केलेली भरती प्रक्रिया आज ना उद्या होणारच आहे, या आशेने पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी आता जोमाने व्यायाम करण्यास सुरुवात केली. भरतीची घोषणा झाल्यापासून शहरातील सर्वच मैदानासह मोठ्या रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

गेल्या पाच वर्षापासून मेगा पोलीस भरती होणार असल्याची चर्चा आहे. महाविद्यायिन तरुण अनेक वर्षापासून पोलीस भरती (Police Recruitment) होण्याचे स्वप्न बाळगून होते. त्यासाठी नियमित अभ्यास आणि सरावही करणारे अनेकजण आहेत. दुसऱ्या सरकारी विभागात नोकरीची इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणावर बेजरोजगारी आहे. अशा स्थितीत राज्यात साडेबारा हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. मराठा आरक्षण स्थगितीमुळे पोलीस भरती प्रक्रिया मागेपुढे होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. थोडा अवधी लागला तरी पोलीस भरती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांमध्ये जोष आहे. पोलीस भरतीची तयारी करण्यामध्ये तरुणींचाही मोठी संख्या आहेत. मुलीही जोमाने तयारी करत असल्याचे चित्र आहे.

पहाटे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत शहरातील सर्व मैदानांवर धावण्याचा व्यायाम करण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. शहरातील मोठ्या रस्त्यावर तरुण धावण्यचा सराव करत आहेत. तसेच सायंकाळच्या सत्रातही मैदानावर गर्दी वाढली आहे. अभ्यास आणि व्यायाम करण्यासाठी तरुणांनी गट केला आहे. धावणे, चालणे, दोरी उड्या, जोर बैठका, लांब उडी आदींचा व्यायाम करताना दिसतात. व्यायाम शाळा बंद असल्याने मैदानावर कसरतीकडे लक्ष दिले जात आहे. दिवसभर तोंडी आणि लेखी परीक्षेची तयारी करण्याकडे कल असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER