गृहमंत्री अनिल देशमुखांचे हे बोलणे अपेक्षित नाही; भाजप नेत्याची टीका

Praveen Darekar-Anil Deshmukh

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता; पण तो वेळीच हाणून पाडला, असा गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. या सर्व प्रकरणानंतर भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी टीका केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे बोलणे अपेक्षित नाही. अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात हिंमत नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. ते कोरोनापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुलाखत देत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून (IPS officers)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा तो डाव हाणून पाडला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही व्यक्त केली. लोकमत ऑनलाईनच्या ‘ग्राउंड झीरो’ (Ground Zero) कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER