मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटिस

Maratha Kranti Morcha - Maratha Reservation - Notice

नाशिक : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव नाराज झाले आहेत. त्यामुळे मराठा संघटनांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यात नाशिक पोलिसांनी (Nashik Police) सकल मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. 149 कलमाखाली ही नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्यानं खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा संघटना आणखी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER