मनसेच्या संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटीस; लोकलने प्रवास करण्यावर मनसे ठाम

Sandeep Deshpande

मुंबई : सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केली आहे. तसेच उद्या सविनय कायदेभंग करत लोकलने प्रवास करण्याचा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला आहे. तर संतोष धुरी यांनी घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना काय कळणार? असा प्रश्न विचारला. तसेच आम्ही सोमवारी लोकलनं प्रवास करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

दरम्यान, मनसेच्या या मागणीला शिवसेनेने (Shivsena) विरोध केला आहे. त्यातच आता शासकीय रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना नोटीस (Notice) बजावली आहे.याबाबत माहिती देताना देशपांडे म्हणाले की, लोकहितासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनाला दडपण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न होतील याची आम्हाला जाणीव होतीच. आमचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरूही केले आहेत.

मला शासकीय रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. हा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून, उद्या लोकलने प्रवास करणारच असा इशारा त्यांनी पुन्हा दिला. आमच्या आंदोलनाला सामान्य नागरिकांसह अनेक प्रवासी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. सामान्य जनांच्या भावना लक्षात घेता आम्ही आंदोलन करणारच, असेही देशपांडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : लोकल प्रवासावरून मनसे-शिवसेना आमने-सामने, उद्या कोणाची सरशी होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER