मनसुख हिरेन प्रकरण : पोलीस निरीक्षक सुनील मानेला अटक

Maharashtra Today

मुंबई : मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात ( Mansukh Hiren case)पोलीस निरीक्षक सुनील मानेला (Sunil Mane) NIAने अटक केली आहे. माने हा कांदिवली क्राईम ब्रँच युनिट-११ चा माजी पोलीस निरीक्षक आहे. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली झाली आहे. दहशतवादविरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIAकडे हस्तांतरित केला. आता सुनील मानेला NIAने अटक केली आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता की, “माझ्या पतीला कांदिवली क्राईम ब्रँचमधून फोन आला होता आणि चौकशीसाठी बोलावले होते.” असे त्यांनी सांगितले.

मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या रात्री नेमके काय झाले? याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या चौकशीतून ATSच्या हाती अनेक पुरावे लागले. त्याशिवाय ATSने सचिन वाझेचे लोकेशन तपासले. मोबाईल टॉवर आणि आयपीचे मूल्यांकनही केले. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या. त्यातून बरेच पुरावे मिळाल्या. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांना क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांची हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. विशेषत: त्यांच्या डोक्यालाही मार लागलेला होता, असे सूत्रांनी सांगितले.

हत्येच्या ठिकाणी वाझे उपस्थित
मनसुख हिरेन यांची हत्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या समोरच करण्यात आली. त्यानंतर त्याच्यासमोरच हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत फेकण्यात आला असावा, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button