बलात्कारीत मुलीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पोलिसांचे वाभाडे

Mumabi HC - Police - Maharastra Today
  • पोलिसी असंवेदनशीलतेने हायकोर्टास धक्का

मुंबई : बलात्कार झालेल्या एका अल्पवयीन मुलीची जबानी नोंदविल्यावर तिला पोलिसांनी सुरक्षित स्थळी न पाठविता निराधार अवस्थेत राहण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या फलाटावर सोडून देणे हे केवळ आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसी असंवेदनशीलतेचे वाभाडे काढले आहेत.

या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कादिर कबिर हुसैन या व्यक्तीने केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीत उघड झालेल्या विचित्र गोष्टी पाहता सर्वच संबंधितांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे नमूद करून न्या. भारती डांगरे यांनी या प्रकरणाचे तपासी अधिकारी व अंधेरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या कायद्याच्या अज्ञानाबद्दल नाराजी व्यक्त केली. न्या. डांगरे यांनी म्हटले की, जाधव यांना कायद्याचे थोडे जरी ज्ञान असते तर त्यांनी या बलात्कारित मलीला बालसुधारगृहात पाठविले असते किंवा ती अल्पवयीन आहे हे लक्षात घेऊन तिचे प्रकरण बाल न्यायमंडळाकडे तरी पाठविले असते. पण जाधव यांनी यापैकी काहीही केले नाही. एवढेच नव्हे तर या मुलीचे वय ती सांगते त्यानुसार खरंच १६ वर्षे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी जाधव यांनी डॉक्टरांकडून तिची वयनिश्चिती चाचणीही(Occification Test) करून घेतली नाही, असे न्यायमूर्तींनी नमूद केले.

सध्या ही पीडित मुलगी कुठे आहे, असे विचारले असता सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर वीरा शिंदे यांनी, न्यायालयात हजर असलेल्या जाधव यांना विचारून ‘त अजूनही अंधेरी र्लेवे स्टेसनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर राहते’, असे उत्तर दिले. त्यावर वरीलप्रमाणे प्रतिकूल शेरे मारत ‘जाधव यांनी त्या मुलीला शोधून काढावे आणि आधी केलेल्या चूका आता तरी सुधराव्यात’ अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.

बलात्काराची ही कथित घटना घडल्यानंतर ही मुलगी जुलै २०१८ मध्ये आठवडाभर महापालिकेच्या कूपर इस्पितळात दाखल होती व त्यावेळी तिच्या पोटातील सात आठवड्यांच्या गर्भाचा रक्तपात करण्यात आला. एवढेच नव्हे तर काढून टाकलेल्या गर्भाची त्यावेळी ‘डीएनए’ चाचणीही करण्यात आली आहे, असे न्या. डांगरे यांना कोर्टापुढे सादर झालेल्या कागदपत्रांतून दिसले. त्यामुळे त्या ‘डीएनए’ अहवालाचे पुढे काय झाले, याची माहिती प्रॉसिक्युटरने द्यावी, असे निर्देश देत ‘हे सर्व चित्र स्पष्ट होईपर्यंत आरोपीला जामिनासाठी वाट पाहावी लागेल’ असे म्हणत सुनावणी १५ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

सिनेमाला साजेसे कथानक

या प्रकरणाचे कथानक एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला साजेसे आहे: दि. २५ जून, २०१८ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास या प्रकरणातील फिर्यादीची स्कूटर एका सिग्नलवर थांबली होती. मुसळधार पाऊस पडत होता. सिग्नलला थांबलेल्या वाहनांच्या गर्दीत फिर्यादीच्या स्कूटरच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली. पावसामुळे रिक्षेचे सर्व पडदे घट्ट बांधून घेतलेले होते व रिक्षातून एका मुलीचा आक्रोश ऐकू येत होता. फिर्यादीने रिक्षावाल्याला विचारले तेव्हा त्याने रिक्षेत पॅसेंजर असल्याचे सांगितले. पण त्या उत्तराने फिर्यादीचे समाधान झाले नाही कारण रिक्षातील मुलीचे रडणे-ओरडणे सुरुच होते. रिक्षावाल्याचे म्हणणे न ऐकता फिर्यादीने रिक्षेचा पडदा बाजूला करून पाहिले तर एक पुरुष त्या ओरडणाºया मुलीवर बलात्कार करताना त्याला दिसला. फिर्यादीने त्या अत्याचार करमाºयास रिक्षेतून खाली उतरण्यास सांगितले. त्याने ऐकले नाही तेव्हा फिर्यादीने त्याला जबरदस्तीने ओढून रिक्षातून काढले. तेवढ्यात वाहतूक पोलीस तेथे आला व त्याने त्या अत्याचार करणाºयास ताब्यात घेतले. कोर्टापुढे  आरोपी म्हणून असलेला कादिर हुसैन हाच तो इसम होता, असे फिर्यादीचे म्हणणे आहे.

पोलीस त्या  मुलाला व आरोपीला घेऊन अंधेरी पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलिसांनी त्या मुलीचा जबानी नोंदविली. मुलीने स्वत:चे वय १६ वर्षे असल्याचे सांगितले व राहण्याचे ठिकाण अंधेरी स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्र. १ असे सांगितले. त्या मुलीच्या म्हणण्यानुसार ती त्या रिक्षावाल्याला घटनेच्या आधी ५-६ महिन्यांपासून ओळखत होती. त्या दिवशी रिक्षावाल्याने तिला बियर पाजली होती व खायला घातले होते. मुलीला नशा चढल्यावर रिक्षावाल्याने तिच्यावर बलात्कार केला व त्याच्यानंतर त्याचा भाऊ तेच दुष्कृत्य करत असताना वर म्हटल्याप्रमाणे पकडला गेला.

आरोपीच्या म्हणण्यानुसार ती मुलगी वेश्या होती व तिच्या संमतीनेच आपण तिच्याशी शरीरसंबंध केला होता. शिवाय ती अल्पवयीन असल्याचा कोणताही पुरावा नाही. आरोपी गेले ३३ महिने तुरुंगात आहे. त्याच्या या बचावाच्या मुद्द्यांचा विचार न्या. डांगरे १५ एप्रिलला करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button