
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा डाव उधळला. भूसुरुंग स्फोटासाठी जमिनीत पुरून ठेवलेली १० किलो स्फोटके जप्त केलेत. नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट शहीद सप्ताह पाळतात.
पोलीस मदत केंद्र मौजा रेगडी ते मौजा कोटमी मार्गावर सी-६० जवान रोड ओपनिंग करत होते. त्यावेळी स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. स्फोटके सापडल्याची माहिती रेगडी केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिली. बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी आले. स्फोटके निकामी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला