सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक ; पोलिसांकडून लाठीमार

मुंबई : प्रजासत्ताकदिनी (Republic Day) झालेली हिंसाचाराची घटना (Incidents of violence) ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. सिंघू बॉर्डरवर (singhu-border) स्थानिक असल्याचा दावा करत नागरिकांनी शेतकरी आंदोलकांविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं. स्थानिक आंदोलक विरुद्ध शेतकरी आंदोलक आमने-सामने आल्यानंतर संघर्षाचा भडका उडाला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील वातावरण दिवसेंदिवस अशांत होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. ‘तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा देत स्थानिकांनी महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंनी आंदोलन सुरू असताना अचानक वादाची ठिणगी पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER