ट्रम्प यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी झाडल्या रबरी गोळ्या

police fire rubber bullets tear gas to disperse protest near white house

वॉशिंग्टन : आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयड या इसमाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत हिंसक निदर्शने सुरू आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान व्हाईट हाऊसही यातून सुटलेले नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे की ट्रम्प याना चर्चमध्ये जाण्यासाठी रास्ता मोकळा करण्याकरता पोलिसांनी निदर्शकांवर रबरी गोळ्या झाडल्या.

सोमवारी ट्रम्प यांना व्हाइट हाऊसजवळच्या सेंट जॉन चर्चमध्ये जायचे होते. रस्त्यात निदर्शने सुरू होती. रास्ता मोकळा करण्यासाठी व्हाइट हाऊसजवळ नॅशनल गार्ड मिलिट्री पोलीस, सिक्रेट सर्व्हिस, होमलँड सिक्युरिटी पोलिसांनी निदर्शकांवर कारवाई केली. अमेरिकेचे अ‍ॅटॉर्नी जनरल विलियम बारही ट्रम्प यांच्यासोबत होते. चर्चमध्ये ट्रम्प यांनी फोटोसाठी काही पोझही दिल्या.

सोमवारी व्हाईट हाऊसजवळ निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या व रबरी गोळया झाडल्या. अमेरिकेत सुरू असलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी मोठया प्रमाणावर बळाचा वापर करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेतील मोठया शहरांमध्ये सहा दिवसांपासून रात्री लुटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हे सर्व थांबवण्याचा निश्चय ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड याला अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा दाबल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरू आहेत.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तरीही निदर्शने सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER