पोलिसांनी उत्साहात साजरा केला ‘गुगल’चा वाढदिवस

Birthday Of Googel

नाशिक :  नाशिकच्या श्वानपथकातील ‘गुगल’चा वाढदिवस पोलिसांनी उत्साहात साजरा केला. त्याला मंचावर बसवून ओवाळले. हार घातला. केकही कापला ! गुगल २९ सप्टेंबरला ३ वर्षांचा झाला. गुगल ‘डॉबरमन’ जातीचा आहे. तो अत्यंत हुशार, चपळ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यात तरबेज आहे. आक्रमक आहे. अनोळखी माणसांना श्वानपथकाच्या कार्यालयात फिरकू देत नाही.

तो दीड महिन्याचा असताना त्याला माँरेन्स के-९ क्लबने पोलीस दलाला सोपवले होते. पोलीस शिपाई हस्तक गणेश कोंडे, अरुण चव्हाण यांनी सहा महिने त्याचे संगोपन केले. नंतर वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र चंदीगडला पाठविण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर गुगलने काम सुरू केले.

आतापर्यंत ७० ‘कॉल’वर गुन्हेगारांचा माग दाखवला. ‘मुथुट फायनान्स’ कार्यालयावर पडलेल्या दरोड्यात आरोपींचा माग शोधण्यात त्याने महत्त्वाची मदत केली. गुन्हेगाराचा माग शोधण्याचे त्याचे नैपुण्य लक्षात घेऊन त्याचे नाव गुगल ठेवले आहे. गुगलच्या कामगिरीची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आहे. मागील वर्षी गुगलने दमदार कामगिरीच्या बळावर राज्यस्तरीय पोलीस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER