पोलीस विभाग बदली रॅकेट : बेकायदेशीर गोपनीय माहिती मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Rashmi Shukla

मुंबई : मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्या अहवालामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस विभागातील कथित बदली रॅकेटसंदर्भात राज्य गुप्तवार्ता विभागाने आज तक्रार दाखल केली आहे. अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभाग येथील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रीक गोपनिय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. याकरीता भारतीय टेलीग्राफ ऍक्ट १८८५ कलम ३० सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३ (व), ६६ सह The Official secrets act, १९९३च्या कलम ५ अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पहिला तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई करीत आहेत.

दरम्यान, वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केलेे. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन ॲक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला असून सरकार आता या अहवालावर काय करते, याकडे लक्ष लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER