पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

AMitab Gupta

पुणे : शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत सांगितले की, एल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगीसाठी आयोजकांनी अर्ज केला होता. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ‘लोक शासन आंदोलन’ या संस्थेने ही परवानगी मागितली होती. तीन वर्षांपूर्वी शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेवरुन देशभर मोठा वाद झाल्यानंतर आता पुन्हा पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येणार होते. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER