कोल्हापुरात कोर्टकाम हाताळणारा पोलीस कोरोनाबाधित

Corona Positive

कोल्हापूर : महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हापुरातील पश्चिम भागातील डोंगराळ गगनबावडा पोलीस ठाण्यात कोर्टकाम पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास आज कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केर्ली गावात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यात १२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यामध्ये केर्ली गावच्या व्यक्तीचा समावेश असून तो पोलीस कर्मचारी आहे. त्याची नियुक्ती गगनबावडा पोलीस ठाण्यात असून तो कोर्टाचे काम हाताळतो. कोरोनामुळे गेली २२ दिवस तो गगनबावडा पोलीस ठाण्यात गेला नसल्याने तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुस्कारा सोडला आहे. तो केर्लीतून थेट कोर्टात गगनबावडा पोलीस ठाण्याशी संबधित प्रकरणे हाताळत होता.

पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केर्ली गावात परिसर सील करण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा कोर्टात कोणत्या पोलीस कर्मचारी, वकील आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांशी संबंध आला आहे याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. अहवालामध्ये गांधीनगर तीन, केर्ली, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ, कोडोली, साजणी हातकणंगले, राधानगरीमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. इचलकरंजीतील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER