सरकार पाडण्याची धमकी देणारे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

Arnab Goswami & FIR

नागपूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सरकार पाडण्याची धमकी दिल्याबद्दल रिपब्लिक भारत वाहिनीचे पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्याविरोधात मंगळवारी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत एकेरी भाषेचा वापर केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखाल्याचेही तक्रारकर्ते रविनीश पांडे यांनी म्हटले आहे. उद्धव साहेब फॅन्सचे संयोजक रविनीश पांडे ऊर्फ चिंटू महाराज यांनी पोलिसात ही तक्रार दाखल केली.

वाहिनीच्या एका कार्यक्रमात अर्णबने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याची धमकी दिली, तसेच मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एकेरी भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात व्हिडीओ कळमना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आला आहे. या तक्रारीत अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक भारत वाहिनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी चिंटू महाराज यांच्यासोबत अरविंद राजपूत, समित कपाटे, विजय शाहू यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER