‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांची गुंडगिरी सुरू’, भाजपकडून पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर

Police Beating - Atul Bhatkhalkar

मुंबई : जालन्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारांच्या बिलावरुन उद्भवलेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांची गुंडगिरी सुरू, असे म्हणत भाजपने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला.

भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मारहाणीचा हा व्हिडीओ शेअर करत आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ही घटना जालन्यातली. पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ज्याला काठ्या तुटेपर्यंत गुरासारखे बडवतायत तो गुंड नसून एक सामान्य तरुण आहे.अशी अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? या राज्यात न्याय व्यवस्था नावाची चीज शिल्लक आहे का?सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे, असे म्हणत भातखळकर यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button