बीट मार्शलची प्रशंसनीय कामगिरी; गळफास घेत असलेल्या तरुणांचे वाचविले प्राण

Police Bit Marshall

पुणे : घरात एकटा असलेल्या पतीने पत्नीला आपण आत्महत्या करीत आल्याचा फोन केला आणि म्हणाला ‘मी घरात लटकून घेतो आहे, तू घरी येईपर्यंत माझा मृतदेहच तुला मिळेल, असा त्याने पत्नीला फोन केला. घाबरलेल्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ मिनिटातच त्याच्या घरी पोहोचले.

त्यांनी खिडकीतून पाहिले तर त्याने गळफास घेतला होता. पण त्याच्या पायाची हालचाल दिसून आली. तेव्हा धिप्पाड बीट मार्शलने आपल्या ताकदीच्या जोरावर भक्कम असा लोखंडी दरवाजा तोडला. दरवाज्याचा पत्रा थोडा तुटताच त्यांनी हात घालून कडी काढली व धावत जाऊन त्या तरुणाला फसवरून खाली उतरविले. त्यांनी पाहिले तर तो बेशुद्ध होता, पण जिवंत होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून प्राण वाचविले. निलेश सुरेश साळवे असे त्या जीव वाचलेल्या युवकाचे नाव आहे. बीट मार्शलच्या समयसूचकतने तसेच तत्परतेने एका तरुणाचे प्राण वाचू शकले तसेच त्याचा संसार वाचू शकला. त्या बीट मार्शलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी पण वाचा : रोहित पवार यांना संधी द्यावी की नाही हे पक्ष ठरवेल : सुप्रिया सुळे

गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यावर काही मिनिटातच बीट मार्शलांनी केलेल्या या प्रयत्नामुळे एका तरुणाचे प्राण वाचू शकले. ही घटना पुणे येथील सहकारनगर, पर्वती दर्शनमधील चाळ क्रमांक ५१ मध्ये घडली. बीट मार्शल होते़ पोलीस काँस्टेबल विष्णू सुतार आणि अनिल लांडे या दोघांनी काही मिनिटात घटनास्थळी पोहचून दाखविलेले. त्यांनी प्रसंगावधान आणि केलेल्या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार, अनिल लांडे हे पर्वती दर्शन भागात बिट मार्शल ड्युटी करत होते. त्यावेळी त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून एक मेसेज मिळाला की, पर्वती दर्शन चाळ नंबर ५१ मध्ये एक तरुण गळफास लावून घेत आहे. आपण ताततडीने तेथे जाऊन त्याला वाचवा. ही माहिती मिळताच दोघेही दिलेल्या पत्त्यावर गेले आणि त्यांनी पाहिले. तेव्हा एका घराचा लोखंडी दरवाजा आतून बंद केलेला होता. त्या घराच्या खिडकीतून पाहिले़ तेव्हा एक युवकाने घराच्या छताला लाल ओढणीने स्वत:ला गळफास घेतला होता़ त्याचे पाय हालताना दिसत होते. त्याला वाचविण्यासाठी विष्णू सुतार, अनिल लांडे या पोलिसांनी लोखंडी दरवाजा तोडला. व त्याला उचलून बाहेर आणले. तो बेशुद्ध असल्याने त्याला सर्वात प्रथम रिक्षातून हरजीवन हॉस्पिटलला नेले़ व नंतर पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार अशोक हिरवाळे, नितीन केरीपाळे यांच्या मदतीने काही वेळात सर्व आवश्यक कार्यवाही करून निलेश सुरेश साळवे याचा जीव वाचविला.

निलेशची पत्नी रोजमेरी साळवे (रा. चाळ नंबर ५१/१ पर्वती दर्शन) या म्हणाल्या, त्यांचे पती निलेश सुरेश साळवे हे अति दारूच्या नशेत घरात असताना मानसिक संतुलन ढासळले की, त्यांच्या मनात असे स्वत:चे जीवन संपविण्याचा विचार येत असतो. ते खरंच काही विपरीत करून घेतील, या चिंतेमधून त्यांनी सर्वात प्रथम पोलिस नियंत्रण कक्ष येथे मदतीसाठी ही माहिती कळवली होती. यावर विष्णू सुतार, अनिल लांडे यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. ज्या उद्देशाने बीट मार्शलची नेमणूक केली जात आहे, तो उद्देश विष्णु सुतार आणि अनिल लांडे यांच्यासारख्यांच्या कामगिरीमुळे सफल होत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.