पोलिसांवर हल्ला करणारा २४ तासांत चकमकीत ठार

Police attacker killed in 24 hours Kasganj

कासगंज : उत्तरप्रदेशच्या (UP news) कासगंज (Kasganj) जिल्ह्यात काल रात्री दारू माफियाने पोलिसांवर हल्ला केला. यात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला व पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झालेत. पोलिसांवर हल्ला करणारा मुख्य आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत २४ तासांत मारला गेला.

कासगंजमधील गावात दारू माफियाला वॉरंट देण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. दारू व्यावसायिकांनी मारहाण करून कॉन्स्टेबलला ठार मारले. पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी बुधवारी सकाळी एन्काउंटरमध्ये मुख्य आरोपीचा खात्मा केला; दुसरा आरोपी फरार आहे, असे कासगंजचे पोलीस अधीक्षक मनोज सोनकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER