मंदिरे उघडी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दरेकर, लाड पोलिसांच्या ताब्यात

Pravin Darekar-Prasad Lad

मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगेन (Mission Begin) अंतर्गत बार, हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक, मॉल्सउघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र राज्यात सर्व धार्मिक स्थळे आद्यपही बंद आहेत. त्यामुळे आज राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून (BJP) राज्यभरात आंदोलन सुरू आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिर तसेच नागपूरातील साई मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या आत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला असून, पोलीसांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांना ताब्यात घेतले आहे.

तसेच राज्यपालांनी सुद्धा मंदिर बंद असल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. जून महिन्यापासून देशातील मंदिरे उघडी झाली आहेत. मात्र आपल्या राज्यात अद्यापही याबाबत निर्णय झाला नाही. मिशन बिगेन अंतर्गत आपण लोकडाउन कचऱ्याच्या डब्ब्यात टाकणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता आपल्याला हिंदुत्वाचा विसर पडला का? धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारले का? मंदिरे उघडी न करण्यासाठी दैवी संकेत मिळाले का? असा प्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER