पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीत लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

Marathi Batmya, Marathi News Portal, Maharashtra Today News, Marathi Breaking News, Maharashtra News, News Maharashtra, Marathi News, Marathi batmya maharashtra, Maharashtra News Headlines,Maharashtra Today,Breaking News Maharashtra,Mumbai News,Crime News,मुंबई,Lockdown,लॉकडाऊन,

मुंबई : लॉकडाऊनमुळे असलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेऊन, आम्ही पोलीस आहोत असे सांगून एकाठिकाणी जमलेल्या लोकांकडून पैसे उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्यात एक अल्पवयीन आहे.

घटना दहिसर येथील आहे. गुरुवारी गणेशनगर झोपडपट्टीत चार-पाच लोक एका ठिकाणी बसले होते त्यावेळी हे तिघे तिथे गेले आणि संचारबंदी असताना तुम्ही नियम तोडून एकत्र जमले आहात म्हणून तुमच्यावर कारवाई करू. कारवाई टाळायची असेल तर पैसे द्या, असे धमकावले.

हे तिघेही थ्री फोर्थ आणि ती शर्ट घालून होते. लोकांनी त्यांना विचारले की तुमचा गणवेश कुठे आहे ? ते म्हणाले की आम्ही डिटेक्शन स्टाफचे आहोत. ओळख पटू नये म्हणून नागरी वेशात फिरतो. लोकांना त्यांच्यावर शंका आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसानी तिघांची चौकशी करून त्यांना अटक केली. अटक केल्याचे नाव अशोक मिस्त्री, त्याचा एक मित्र आणि एक अल्पवयीन आहे.

या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, कोणी स्वतःला पोलीस सांगून संशयास्पद वागत असेल तर जवळच्या पोलिसठाण्याशी संपर्क करा.