जलसमाधी आंदोलन करणारे शिवक्रांती सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Maratha Reservation

राज्य सरकारने ठोस भूमिका घेऊन मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळवून द्यावे, या मागणीसाठी औरंगाबादच्या दहेगाव येथे शिवक्रांती सेनेच्या (Shivkranti Sena) कार्यकर्त्यांनी दहेगाव येथे सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून आंदोलनाला सुरुवातही केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

सर्वोच्च न्यायालयात (SC)सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडली. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मात्र ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार कुठलेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप शिवक्रांती सेनेने केला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला, अशी माहिती शिवक्रांती सावंत, प्रदेशाध्यक्ष सुनील बोडखे, सोमनाथ मगर, सुनिल पेभरे, दादासाहेब घायवट पंकज गायकवाड, शिवकुमार भागवत, महेश बोडके, भगर मगर यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER