दहा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

accused arrested

औरंंगाबाद :- जामीनावर सुटका झाल्यावर गेल्या दहा वर्षापासून फरार असलेल्या विजय उर्फ गोट्या खुशाल सुर्यनारायण (वय ३२, रा.कडेठाण, ता.पैठण) याला उस्मानपुरा पोलिसांनी गजाआड केले.

रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगर येथील रहिवासी व्यंकट नवीन चक्रवर्ती (वय ३२) यांच्या घरातून विजय उर्फ गोट्या सुर्यनारायण याने १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. सुर्यनारायण यास अटक केल्यावर न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती तेंव्हापासून तो फरार होता. उस्मानपुरा डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, सतीश जाधव, संतोष शिरसाट, संजयसिंग डोभाळ यांनी कांचनवाडी परिसरातील फ्लोरासिटी येथे सापळा रचून विजय उर्फ गोट्या सुर्यनारायण याला अटक केली.

पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोंखे, पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.