केंद्राकडे बोट दाखवत ‘ठाकरे’ सरकार स्वतःचे अपयश लपवू शकत नाही – रामदास आठवले

Uddhav Thackeray-Ramdas Athawale

मुंबई : रेमडेसिवीरसह (Remdesivir) सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. ठाकरे सरकार (Thackeray Government) केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे सरकारला लगावला. कोरोनाचा (Corona) कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही आठवले यांनी आज केले.

कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह सर्व औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button