राठोडांचा राजीनामा घेऊ नका, पोहरादेवीतील महंतांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

मुंबई : वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) हे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही आहे तर, दुसरीकडे संजय राठोडांचा घेऊ नये, अशी विनंती पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. सध्या चौकशीचा अहवाल येईपर्यंत त्यांचा राजीनामा (resignation) घेऊ नये. जर ते दोषी आढळले तर पोहरादेवी (Pohardevi temple) येथे येऊनच राजीनामा देतील, असे पत्र महंतांनी मुख्यामंत्र्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे.

संजय राठोड हे आज किंवा उद्या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदाचासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच राठोड राजीनामा देण्याआधी बंजारा समाजाचे महंत तसेच बंजारा समाजाशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील, संजय राठोड हे आज किंवा उद्या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदाचासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

दरम्यान, संजय राठोड मंत्रिपदासोबतच आपल्या आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याचीही शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER