संजय राठोडांच्या राजीनाम्यामुळे पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराजांचा संताप!

Sanjay Rathod And Jitendra Maharaj

वाशिम : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्यामुळे पोहरादेवी मंदिर येथील महंत जितेंद्र महाराज संतापले. ‘संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक आहे’ असे ते म्हणालेत. केवळ विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ही कारवाई झाली आहे. अजून चौकशी होणे बाकी असताना राठोड यांचा राजीनामा घेणे चूक आहे.

राठोड यांच्या राजीनाम्यामुळे समाजामध्ये नाराजी आहे, असा इशारा जितेंद्र महाराज यांनी दिला. पूजा चव्हाण प्रकरणाची अद्याप चौकशी झालेली नाही. फक्त विरोधकांनी मागणी लावून धरली आहे. आम्ही आधीच्या मागणीवर ठाम आहोत. चौकशी केल्यानंतर कारवाई केली असती तर स्वीकारले गेले असते. या प्रकरणामुळे समाजाची नाहक बदनामी झाली आहे. कोरोनाचा काळ ओसरल्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, या बैठकीला संजय राठोड नक्की येतील, असे ते म्हणालेत.

महंत जितेंद्र महाराज यांनी आज सकाळी ई-मेल करून मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, संजय राठोड यांच्याबद्दल ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका. संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावू, असा इशाराही जितेंद्र महाराज यांनी दिला होता. आता संजय राठोड यांच्या भूमिकेनंतर पुढील निर्णय घेईल, असे जितेंद्र महाराज म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER