पोह्याची आलू टिक्की

tikki

एखाद्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रमा वेळी मेनू मध्ये असणारा पदार्थ म्हणजे ‘पोहा’. विशेषतः घरी पाहुणे आले की झणझणीत पोह्यांचाच बेत असतो. प्रत्येकाच्या घरी कांदेपोहे, बटाटेपोहे हे पोह्यांंचे प्रकार नेहमीच बनत असतात. आपण हे प्रकार तर नेहमीच खात असतो. पण कधी तुम्ही पोह्याची आलू टिक्की खाल्ली आहे का?? नाही..?चला तर मग बनवायला सुरु करूया…

साहित्य :- 

  • भिजवलेले पोहे
  • किसलेले पनीर
  • दोन ते तीन उकडलेले बटाटे
  • ब्रेड क्रम्स
  • आलं–लसूण पेस्ट
  • मिरची पेस्ट
  • धने–जिरे पावडर
  • मिरपूड
  • मीठ

कृती :- सुरवातीला एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे घ्यावेत. मग उकडलेले बटाटे कुस्करून किंवा किसून त्यामध्ये एकत्र करावेत. किसलेले पनीर असे सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर त्यात लसूण, मिरची पेस्ट, थोडी धने-जिरे पावडर, मिरपूड व चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाच्या छोट्या टिक्की बनवाव्यात. ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय कराव्यात आणि पुदीना चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.