पंतप्रधानांचं कार्यालयच OLX वर टाकलं विक्रीला; चार जण अटकेत

BJP-OLX

वाराणसी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीमधून एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी पंतप्रधानांच्या संसदीय कार्यालयाला विक्रीसाठी ओएलएक्सवर (OLX) टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान मोदींच्या संसदीय कार्यालयाचा फोटो काढून तो OLX वर टाकण्यात आला आणि याची किंमत तब्बल ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली. OLX वर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये, पंतप्रधान कार्यालयातील आतील संपूर्ण माहिती, खोल्या, पार्किंगच्या सुविधेसह इतर गोष्टींबाबतही माहिती देण्यात आली आहे.

हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर, OLX वरून ही जाहिरात हटवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. ज्या व्यक्तीने फोटो काढून OLX वर टाकला होता, त्यालाही अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या संसदीय क्षेत्रात कार्यालय तयार केलं असून अनेक लोक येथे त्यांच्या समस्या घेऊन येतात. पंतप्रधानांचं हे कार्यालय वाराणसीतील भेलूपूर भागात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER