पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी : कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम

कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM Street Vendor Attmanirbhar Fund) योजनेंतर्गत आतापर्यंत ४६ टक्के फेरीवाल्यांना कर्ज वितरण करून कोल्हापूर महानगरपालिकेने (Kolhapur Municipal Corporation) राज्यात प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे.

पंतप्रधानपथविक्रेताआत्मनिर्भरनिधीयोजनेंतर्गत पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये पथपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ६ हजार ६१० पथविक्रेत्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत ४ हजार ३१२ पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळून यापैकी ३ हजार १६ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. शहरातील बँकांनी जवळपास १ हजार २७६ जणांचे कर्ज मंजूर केले आहे. राज्यात इतर सर्व महानगरपालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिका आघाडीवर आहे. आजअखेर महानगरपालिकेने दिलेल्या उद्दिष्टांपैकी सर्वात जास्त कर्जाचे वाटप केले आहे.

याबाबत ज्यांनी अर्ज केलेले आहेत; परंतु त्यांची कागदपत्रे अपूर्ण होती त्यांच्यासाठी शनिवारी (दि. २) शहरातील सर्व बँकांमध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिका क्षेत्रात अधिक गतीने राबवून कोल्हापूर महानगरपालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतून महानगरपालिका क्षेत्रातील एकही पथविक्रेता वंचित राहू नये, यासाठी प्रशासक सर्वतोपरी मदत करेल, असे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER