ठाकरे सरकार आणि केंद्रातील वादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया म्हणाले…

pm modi-uddhav tahckeray

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्य सरकार आणि केंद्रामध्ये वाद सुरु असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संदेश देत कोरोना महामारीशी लढत असताना आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला समर्थन देत नसल्याचे सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांशी( Uddhav Thackeray) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या(Video Conference) माध्यमातून गुरुवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यांमध्ये सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन जणू काही स्पर्धा सुरु आहे. हे राज्य पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. ते राज्य खूप चांगले काम करत आहे. राज्यांची तुलना करणं आजकाल एक फॅशन झाली आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले . केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकावर लसींच्या पुरवठ्यावरुन केलेल्या टीकेनंतर नरेंद्र मोदींनी हे विधान केले आहे.

जर रुग्णसंख्या जास्त असेल तरी तुम्ही जास्त चिंता करु नका असं मी सांगितलं आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपली कामगिरी खराब आहे अशा दबावात राहू नका. मी आत्ताही तुम्ही टेस्टिंगकडे लक्ष द्या असं सांगत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपण खराब कामगिरी करत आहोत असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या अजून वाढताना दिसेल,असे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वस्त करताना सांगत होते.

ही बातमी पण वाचा :कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंतप्रधानांना ठाम विश्वास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button