सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi named Somnath Temple trust chairman

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष करण्यात आले आहे. ‘सोमनाथ मंदिर ट्रस्टचे (Somnath Temple trust) विश्वस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी विश्वस्तांच्या डिजिटल बैठकीत नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली’, अशी माहिती ट्रस्टचे सचिव पी. के. लाहेरी यांनी दिली.

पंतप्रधानांना ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय सर्व विश्वस्तांनी ऑनलाइन बैठकीत एकमताने घेतला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), गुजरातमधील तज्ज्ञ जे. डी. परमार आणि उद्योगपती हर्षवर्धन निओतिया, हे ट्रस्टचे इतर सदस्य आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या निधनानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER