प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा : पंतप्रधानांचे आवाहन

PM Modi

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केलं. मोदींचा हा ७०वा ‘मन की बात’  कार्यक्रम आहे. सकाळी ११ वाजता मोदींनी देशवासीयांना संबोधित केलं. आज धम्मचक्र प्रवर्तन  दिन आणि दसऱ्याच्या (Dussehra festival) मुहूर्तावर मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचेदेखील पर्व असल्याचे त्यांनी सुरुवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो.

तेव्हा सर्वांत अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं काय? खरेदी करायची. विशेषतः  मुलांमध्ये याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचे  उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुळलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात.

मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत त्यात आपला विजयदेखील निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत होती. मात्र यंदा असे होऊ शकले नाही. पूर्वी दसऱ्याला मोठमोठ्या जत्रा भरत असत. मात्र यंदा त्यांचे स्वरूपदेखील वेगळचे आहे. रामलीलाच्या उत्सवाचेदेखील मोठे आकर्षण होते. मात्र त्यावरदेखील काहीना काही निर्बंध आले आहेत. पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र येत होता. मात्र यंदा मोठमोठाले आयोजन सर्व बंद आहेत. आता पुढे आणखी उत्सव येणार आहेत.

ईद, शरद पोर्णिमा, वाल्मीकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरुनानक जयंती आदी उत्सव आहेत. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचे आहे, मर्यादेतच राहायचे आहे. असेही त्यांनी सांगितले. सणांमध्ये सीमेवर असलेल्या सैनिकांनाही लक्षात ठेवा. आम्हाला प्रत्येक घरात या वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावायचा आहे. भारतातील मलखांब विदेशात फेमस आहे. अनेक देशांमध्ये आता हा खेळ खेळला जातो, त्याची विश्व चॅम्पियनशिपही होते. तसेच, योगाचाही विदेशात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER