पंतप्रधान मोदींची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट, कोरोना लसीचा घेतला आढावा

Pm Modi

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शनिवारी देशातील कोरोना विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ‘मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला.

यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब हात जोडून मोदींचं स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी आदर पुनावाला यांचा शालेय वयातील मुलगा देखील उपस्थित होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना त्यावर मारा करण्यासाठी कोरोना लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

एवढंच नाही तर लस निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना कामगिरीबद्दल शुभेच्छाही दिल्या. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेत ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती घेतली. या बैठकीनंतर लसचं उत्पादन जिथे सुरू आहे, त्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट दिली. लसची निर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल, यावर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येतआहे. जवळपास तासभर पंतप्रधान सीरम इन्स्टिट्युटमध्ये होते.

मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित नव्हते. पंतप्रधान मोदी यांचे वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. येथे ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमांडर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोदींचे स्वागत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER