पंतप्रधान मोदींचा लेह दौरा हा जवानांचे मनोधैर्य वाढवणारा : शरद पवार

Sharad Pawar -PM modi

मुंबई :- पंतप्रधान मोदींचा लेह दौरा हा जवानांचे मनोधैर्य वाढवणारा होता. १९६२ च्या युद्धात चीनने केलेल्या पराभवानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे LAC वर गेले होते, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींच्या लेह दौऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे.

१९६२ मध्ये नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांनी LAC वर जाऊन जवानांचे मनोधैर्य वाढवले होते. सध्याच्या पंतप्रधानांनीही तेच केले. अशी तणावाची स्थिती निर्माण झाल्यावर देशाच्या नेतृत्वाने जवानांचा प्रोत्साहन देण्यासाठी अशी पावलं उचलली पाहिजेत, असं शरद पवार म्हणाले. तर उभय देशांनी तणाव वाढेल अशा प्रकारची पावलं उचलू नये, असं म्हणत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पंतप्रधान मोदींच्या लेह दौऱ्यावर आक्षेप नोंदवला होता.

चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान मोदींना ‘Surender Modi’ असे संबोधले होते. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. चीनसारख्या शेजारी देशासोबत तणावाची स्थिती असताना अशा मुद्द्यावर राजकारण करायला नकोय, असं शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान गलवान खोऱ्यात १५ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीन सीमेवरील तणाव अधिकच वाढला. दोन्ही देशांमधील तणाव चिघळत चालला होता. याच दरम्यान पंतप्रधान मोदी लडाखमध्ये पोहोचले आणि त्यांनी निमू येथे आघाडीवर तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला. तसंच हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी जवानांची ही त्यांनी विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER