मोदींच्या वाराणसीतील ऐतिहासिक विजयापेक्षा पराभवच जास्त ऐतिहासिक असेल : मायावती

modi-mayawati

चेन्नई : बसपा प्रमुख मायावतींनी पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासाच्या मुद्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत म्हटले आहे कि पंतप्रधान नरेंद्र मोदी जर वाराणसीतून पराभूत झाले तर तो ऐतिहासिक विजयापेक्षा जास्त ऐतिहासिक पराभव ठरेल.

ही बातमी पण वाचा:- मोदी कमी पडले तर मायावतींचे जमू शकते भजन 

ट्विटरवरून मायावती यांनी गुजरातच्या विकास मॉडेलवर हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधील तीव्र गरीबी, बेरोजगारी आणि मागासलेपण दूर करण्यात गुजरातचे विकास मॉडेल यशस्वी ठरले नाही. मोदी-योगींचे डबल इंजिन असलेल्या सरकारने विकासाऐवजी फक्त साम्प्रदायिक तणाव, द्वेष आणि हिंसाचाराशिवाय काहीही दिले नसल्याचे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दोन्ही पूर्वांचल उत्तर प्रदेशचे नेतृत्व करत असताना त्यांनी येथील जनतेशी बेईमानी केली आहे. जर गोरखपूरमधून योगींना फटका बसू शकतो तर पंतप्रधान मोदींना वाराणसीतून बसू शकतो. वाराणसीतील मोदींचा पराभव त्यांच्या ऐतिहासिक विजयापेक्षा जास्त ऐतिहासिक असेल? 1977 साली जे रायबरेलीत झाले ते वाराणसीतही होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

मायावतींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या रायबरेलीतील 1977 सालच्या पराभवाचा संदर्भ दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान 19 मे रोजी होत आहे. सहा राज्यातील 59 जागांवर होत असलेल्या या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघाचाही समावेश आहे. येथून ते दुस-यांदा निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून निवडणक लढवत असून येथे नामांकन दाखल करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात रोड-शो आयोजित केला होता. त्यानंत ते वाराणसीत प्रचारासाठी गेले नाहीत. मागील निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अजय राय येथून पराभूत झाले होते. यावेळीही ते मोदीच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. तर सपाकडून येथून शालिनी यादव निवडणूक लढवत आहे.