पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधणार; अनलॉकबाबत बोलण्याची शक्यता

PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करतील. कोरोनाची (Corona virus) दुसरी लाट नियंत्रणात असून अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली.

पंतप्रधान मोदी कोणत्या विषयावर देशाशी संवाद साधणार हे अद्यापही स्पष्ट केले नाही. त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, अजूनही बऱ्याच राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेले नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणही थांबले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button