भिवंडी दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट; दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे दिले आश्वासन

PM Modi tweet on Bhiwandi building-collapse tragedy.jpg

मुंबई : भिंवडीमध्ये (Bhiwandi) सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळली (building-collapse tragedy). या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या (NDRF) जवानांना यश आलं आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दुःख व्यक्त केले आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर नरेंद्री मोदी यांनी एक ट्विट केले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER