आयपॅडवरच्या सादरीकरणातून मोदींनी दूर केले ट्रम्प यांचे गैरसमज

PM Modi took out iPad, made on-the-spot presentation for Trump

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताशी द्विपक्षीय व्यापारावरील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आपले आवडते गॅझेट वापरले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि कलम ३७० रद्द करणे याबाबत भारताची बाजू भक्कमपणे मांडून याबत त्यांचे समाधान केले.

ट्रम्प यांचा असा गैरसमज आहे की अमेरिका भारतासोबत व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत असतानां, व्यापारातील तूट भरून काढण्याचे प्रयत्न करत असताना भारत मात्र त्यांचा प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देत नाही.

मोदी यांनी आय पॅडवरून आकडेवारी सादर करून ट्रम्प यांना पटवून दिले की २०१४ ला (मोदी यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा) अमेरिका आणि भारताच्या व्यापारात असलेली तूट चार वर्षात, २०१८ ला २२ टक्के कमी झाली आहे. भारतातले जे विध्यार्थी अमेरिकेत शिकायला जातात त्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत दर वर्षी सुमारे सहा बिलियन डॉलरची भर पडते. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना सांगितले की अमेरिका भारताला ड्रोण, लढाऊ विमानासह सर्व अत्याधुनिक शास्त्रस्त भारताला विकण्यास तयार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदी यांनी ट्रम्प यांच्या सीएए बाबतच्या शंका दूर केल्या. पाकिस्तानसह भारताच्या शेजारील मुस्लिम देशांमध्ये ख्रिश्चनांसह अन्य अल्पसंख्यकांची संख्या कशी कमी होते आहे व त्यामुळे या समूहांसाठी सीएए कसा आवश्यक आहे व कोणालाही नागरिकत्वापासून वंचित ठेवत नाही, हे पटवून दिले.

जमु – काश्मीरच्या संदर्भात विविध गटनांच्या आधारे मोदी यांनी ट्रम्प यांना पटवून दिले की पाकिस्तानशी संबंध सुधारण्याबाबत मी सतत प्रयत्न करत असताना पाकिस्तान भारतीय नागरिकांनाविरुद्ध दहशतवादाचा वापर करत आहे.