संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी यांना भेटणार : खासदार संजय मंडलिक

Shambhaji Raje

नवी दिल्ली : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दिल्ली येथे भेट घेवून मराठा आरक्षणाबाबतच्या पाठिंब्याचे पत्र दिले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून पंतप्रधान यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तीश: माझ्या व राज्य शासनाच्या आहेत. मराठा समाजास आरक्षण लागू करण्याचा कायदा संमत झाला, त्यामागे सर्वपक्षासह मराठा समाज आणि मराठा समाजाच्या संघटनांची एकसंघ ताकद होती. उच्च न्यायालयातही आपला विजय झाला होता. तरीसुद्धा,सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे राज्य सरकारचे आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचे म्हणणे मान्य केले तर दुसरीकडे त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. तामिळनाडूतील अशाच आरक्षण प्रकरणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग करताना तेथील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नव्हती. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणास स्थगिती देण्याचा निकाल धक्कादायक व दुर्देवी आहे. हा लढा आपल्या सर्वांचा असल्याचे खासदार मंडलिक यांनी म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER