पंतप्रधान मोदींना मराठा क्रांती ठोक मोर्चा पुण्यात अडवणार

PM-Narendra-Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे २८ नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.ते पुण्यातीस सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute Pune) भेट देऊन कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहेत. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा ‘मराठा आरक्षणासाठी’ त्यांचा रास्ता रोखेल, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Aabasaheb Patil) यांनी दिली आबासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडवून मराठा क्रांती ठोक मोर्चा एल्गार करणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार नाही.

मराठा समाजाला राज्याच्या आणि केंद्राच्याही सुविधा मिळत नाही आहेत. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेऊ, असे आबासाहेब पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER