पंतप्रधान मोदींनी कंगना रणौतचे मानले आभार!

PM Modi- Kangana Ranaut

नवी दिल्ली : कंगना रणौत ( Kangana Ranaut) काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. कंगना काय म्हणते, ती काय ट्विट करते याकडे अनेक जण लक्ष ठेवून आहेत. माध्यमांसाठी कंगना बातमीचा विषय बनली आहे. अशातच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी कंगना रणौतचे आभार मानले आहे.

पंतप्रधान मोदींनी काल ७० वा वाढदिवस (70th Birthday) साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कंगनानेही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक शुभेच्छुकाचे आभार मानले. तसेच कंगनाचेही आभार मानले आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

आपल्यासारखे पंतप्रधान देशाला लाभले हे आमचं भाग्य असल्याचं कंगणानं व्हिडीओत म्हटलं. देशातील कोट्यवधी लोक आपल्यावर प्रेम करतात, मीही त्यापैकीच एक असून आपणास भेटण्याचा योग आला; पण बोलणं कधीही झालं नाही, असं कंगना म्हणाली. नरेंद्र मोदींनी कंगनाचे हे ट्विट रिट्विट करत ‘कंगनाजी आपले आभार’ असं म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा :‘त्या’ गोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खात आहे ; शिवसेनेचा केंद्रावर घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER