मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा,राज्यासाठी केली महत्त्वाची मागणी

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चे अ‍ॅप्लिकेशन वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे.

हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता.

उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. राज्यातील कोविड 19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली आहे. तसंच राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनची कमतरता आजही जाणवत आहे. त्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button