महाराष्ट्रातील कोरोनाच्या उपाययोजनांबाबत मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा

PM Modi Speaks to Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. यावरच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगबाबतही चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची काय स्थिती आहे? काय उपाय योजता येऊ शकतात या संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे .

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर एक रुग्ण बुलडाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरून रुग्णसंख्या थेट ३३५ वर गेली आहे.

कोरोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० वर गेली आहे. यामधले सर्वाधिक ३३५ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे