कर्नाटकचा निकाल लागताच पंतप्रधान मोदींचा शिवसेनेला टोला

PM modi-slams-shivsena-after-karnatak-assembly-bypolls-result

मुंबई :- कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दमदार विजय झाला आहे. 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला १२ जागांवर विजय मिळाला आहे. हा विजय निश्चित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला इशारा दिला आहे.

‘संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते,’ असं म्हणत नरेंद्र मोदींना शिवसेनेला इशारा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आम्ही पर्याय सुचवतो, मोदी-शाह यांनी साहस दाखवावे – शिवसेना

‘कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,’ असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

कर्नाटक पोटनिवडणूक निकालः देवेंद्र फडणवीस म्हणतात…

कर्नाटकमध्ये आता जोडतोडीचं नाही तर स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे. झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही. काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर करून घेते. त्यानंतर आपल्या हितासाठी सोबत असलेल्या पक्षांना वापरून घेते. याचा परिणाम म्हणजे लोकांना कधीही चांगलं सरकार मिळत नाही,’ अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

दरम्यान कर्नाटकतल्या बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशाने १५ मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. याची आज मतमोजणी सुरु आहे, यामध्ये भाजपा १२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ सहाच जागा आवश्यक आहेत. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार या पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे.